Breaking News

जिल्हा रिक्षा पंचायत संघटनेची निदर्शने

परवाना जारी करण्याच्या तारखेची मुदत संपत चालल्याने रिक्षाचालक संतप्त

अहमदनगर, दि. 02,  नोव्हेंबर - रिक्षा परवान्यासाठी निर्गमित केलेल्या शासन निर्णयावरील निर्बंध उठवले असतानाही ऑनलाईन फॉर्म भरणार्या रिक्षा चालकांना परवाना जारी क रण्यात आले नाहीत. यामुळे तातडीने ऑटो रिक्षा परवाना सुरु करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात  आले. यावेळी रिक्षा चालकांनी परवाने मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उपाध्यक्ष हमीद देशमुख, ताजोद्दीन मोमीन, सचिन बडेकर, गुलाम दस्तगीर, अशोक शिंदे,  समीर कुरेशी, विजय शेलार, राहुल पवार, सागर काळभोर, शाहू लंगोटे, निर्मल गायकवाड, सुनिल पवार, शादाब तांबोली, कैलास डरागे, विक्रम साठे, वसिम शेख, जालिंदर घोलप  आदिंसह रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिक्षा परवान्यासाठी संघटनेच्या वतीने शासनस्तराव पाठपुरावा करण्यात आला होता. शासनाने शासन निर्णय क्रमांक एम.व्ही.आर. 0815 /प्र.क्र.387 /परि 2 हा  दि.18 जुलै  2017  रोजी निर्गमित केला. या शासन निर्णयान्वये सातशे ते आठशे रिक्षा चालकांनी परवान्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरले. यानंतर परिवहन आयुक्त कार्यालयाकडून  दि.9  ऑगस्ट  रोजी या शासन निर्णयावर काही काळासाठी निर्बंध घालण्यात आले . या निर्णयामुळे रिक्षा परवान्यासाठी फॉर्म भरलेल्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर दि.22 सप्टें बर रोजी या शासन निर्णयावरील निर्बंध उठविण्यात आल्याने रिक्षा चालकांमध्ये परवाने मिळण्यासाठी आशा पल्लवित झाल्या.
खाजगी संवर्गातील नोंदणी झालेली ऑटो रिक्षा परिवहन नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि.31  मार्च 2018  राहणार असल्याचे शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे. या  अनुषंगाने शासनाची वेबसाईट पुन्हा सुरु करण्यात आली. त्यानुसार रिक्षा चालकांनी पुन्हा ऑनलाईन फॉर्म भरले. त्यामुळे सर्वांना परवाना जारी करण्याच्या तारखेचे मोबाईलवर  मेसेज आले आहेत. त्या तारखेची मुदत संपत चालली असून, तातडीने रिक्षा परवाने सुरु करण्याची मागणी यावेळी   संघटनेच्या वतीने करण्यात आली . या मागणीचे निवेदन  जिल्हाधिकारी अभय महाजन तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी वाघमारे यांना देण्यात आले.