Breaking News

नगरमध्ये रंगणार मराठी साहित्य संमेलन

बहुरंगी बहुढंगी कार्यक्रमाद्वारे मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचे होणार दर्शन

अहमदनगर, दि. 02,  नोव्हेंबर - मराठी भाषा समृद्ध व्हावी  तसेच  भाषेचा अभिजात दर्जा वाढीस लागावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद , पुणे यांचे सावेडी शाखेतर्फे नगरमध्ये   विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करन्यात आले आहे. हे संमेलन येत्या  शनिवारी व रविवारी ( दि.4 व 5  नोव्हेबर) होणार आहे. 
संमेलनात पुरस्कार वितरण, कथाकथन, कवी संमेलन, प्रकट मुलाखती, महाचर्चा अशा साहित्यिक  व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  अशी माहिती  म.सा.प. सावेडी साखेचे अध्रक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष  नरेंद्र फिरोदिया  यांनी  दिली.
टिळक रोडवरील लक्ष्मी नारायण मंगलकार्यालयात हे संमेलन रंगणार आहे. या संमेलनास माजी. खा. यशवंतराव गडाख, डॉ. कुमार सप्तर्षी, पोपटराव पवार, माजी आ. अनिल  राठोड, डॉ. सुजय विखे, सत्यजित तांबे,पालकमंत्री राम शिंदे, खा.दिलीप गांधी, आ. संग्राम जगताप, माजी संमेलनाध्रक्ष श्रीपाल सबनीस,  जिल्हाधिकारी अभय  महाजन, महापौर  सुरेखा कदम,आदीसह मान्यवर  उपस्थित राहणार आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.