Breaking News

संत नामदेवांच्या कार्याचा प्रचार आवश्यक - चंद्रकांत लोळगे

अहमदनगर, दि. 02,  नोव्हेंबर - संत नामदेव महाराज हे पांडूरंगाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी सर्व समाजाच्या उन्नत्तीचे काम केले. त्यांचे कार्य हे सर्व भारतभर प्रचित आहेत.  समाजानेही त्यांच्या या कार्याचा प्रचार व प्रसार करावा. तसेच समाज जागृतीसाठी सर्वांनी एकत्र येवून समाजाच्या उन्नत्तीचे काम करावे. सावेडी भागातील समाजाचे हे मंदिर आता  चांगले नावारुपास येऊ राहिले आहे. समाज बांधवांनीही या मंदिराच्या कार्यात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लोळगे यांनी केले.
संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त सावेडी, शिंदे मळा येथील संत नामदेव मंदिरात श्री.अशोक व सौ.हेमलता वडे यांच्यावतीने देण्यात आलेल्या ‘संत नामदेव महाराज  पांडूरंगाला नैवद्य भरवतांनाचे’ शिल्पाचे अनावरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  दत्तात्रय वडे, अनंत पतंगे, कैलास खंदारे, विष्णूपंत वनारसे, शंकरराव उंडाळे, भ गिरथ उरणकर, प्रभाकर उरणकर, संजय काकडे, ज्ञानेश्‍वर कविटकर, दिलीप काकडे, दिलीप वडे आदि उपस्थित होते.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या  जयंतीनिमित्त शिंदेमळा, सावेडी येथील नामदेव मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.