Breaking News

विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई


जळगाव, दि. 26, नोव्हेंबर - भुसावळ तालुक्यातील बोहर्डी बु.॥ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणा-या नऊ वर्षीय विद्यार्थिनीवर तसेच अन्य काही विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणा-या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणी मुख्याध्यापकाला अटकही करण्यात आली होती. या गंभीर घटनेची दखल घेत मुख्याध्यापक गणेश चुडामण कोलते (वय 48, रा. मच्छींद्र नगर, वरणगाव) यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी एस.बी.मावळे यांनी दिली. ते म्हणाले की, शिक्षण विभागाला वरणगाव पोलिसांकडून एफआयआरची प्रत मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.