मेकॅनाईज्ड इन्फंन्ट्री रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास प्रेरणा देणारा - पी.एम.हेरिज
अहमदनगर, दि. 06, नोव्हेंबर - मेकॅनाईज्ड इन्फंन्ट्री रेजिमेंट चा इतिहास वैभवशाली व गौरवशाली आहे.हा इतिहास सैनिकांना प्रेरणा देणारा आहे.शपथग्रहण करून सेनेत दाखल होणा-या युवा सैनिकांनी रेजिमेंट चा इतिहास असाच उंच ठेवायचा आहे,असे प्रतिपादन लष्कराच्या दक्षिण कमांडचे जीओसी इन सी व कर्नल ऑफ द रेजिमेंट लेफ्टनंट जनरल पी.एम.हेरिज यांनी केले.
भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फट्री रेजिमेंट सेंटर अर्थात एमआयआरसीत कठीण परिश्रम व कठोर मेहनतीच्या आधारे 36 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्यात प्रवेश करण्यासाठी तयार झालेल्या जवानांच्या 411 व 413 व्या तुकडीतील 361 सैनिकांनी शानदार समारंभात देशसेवेची शपथ घेतली.लष्कराच्या दक्षिण कमांडचे जीओसी इन सी व कर्नल ऑफ द रेजिमेंट लेफ्टनंट जनरल पी.एम.हेरिज यांनी या शानदार परेडचे निरीक्षण केले.यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व शपथग्रहण करणा-या सैनिकांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.अहमदनगर मध्ये असलेल्या भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फन्ट्री रेजिमेंट सेंटर अर्थात एमआयआरसी तील अखौरा ड्रील मैदानावर आयोजित दीक्षांत समारंभात प्रशिक्षण पूर्ण करणा-या 411 व 413 व्या तुकडीतील 361जवानांनी शानदार परेड करून लष्कराच्या दक्षिण कमांडचे जीओसी इन सी व कर्नल ऑफ द रेजिमेंट लेफ्टनंट जनरल पी.एम.हेरिज यांना मानवंदना दिली.लेफ्टनंट जनरल पी.सी.थिमय्या,लेफ्टनंट जनरल सतीश नंबियार, एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही.व्ही.सुब्रमण्यम,डेप्युटी कमांडंट कर्नल यू.एम. विशाल सहीत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व रिक्रुट जवानांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.लष्करी प्रथेनुसार विविध धर्म गुरूंनी परेड मैदानात आणलेल्या भगवत गीता,गुरूग्रंथ साहिब,कुराण शरीफ,बायबल सारख्या आपापल्या पवित्र धर्मग्रंथांवर हात ठेवून देशसेवेची शपथ घेतली.परेड अॅडज्युटंट लेफ्टनंट कर्नल सुधीर कालिया यांनी या रिक्रुट जवानांना देशाचे संविधान व देश संरक्षणासाठी इमानदारी,निष्ठा व कठीण स्थितीत आपली जबाबदारी पूर्ण करण्याची शपथ दिली.लेफ्टनंट जनरल पी.एम.हेरिज यांच्या हस्ते 411 व 413 व्या तुकडीतील सर्वोत्कृष्ट रिक्रुट साठीचे जनरल सुंदरजी सुवर्ण पदक रिक्रुट नवनीत सिंग व रिक्रुट लव्हप्रीत यांना,जनरल डिसुजा रजत पदक रिक्रुट गगन ज्योत सिंग व रिक्रुट शोभित याला तसेच रिक्रुट अब्दुल रहीम व रिक्रुट विशाल राणा यांना जनरल पंकज जोशी कांस्य पदक देऊन गौैरविण्यात आले.
दीक्षांत संचलनाचे निरीक्षण केल्यानंतर बोलतांना लेफ्टनंट जनरल पी.एम.हेरिज यांनी प्रशिक्षण पूर्ण करणार्या युवा सैनिकांना शुभेच्छा दिल्या.ते म्हणाले,प्रत्येक सैनिक हा त्याची पलटण व लष्कराच्या दृष्टीने शान असते.खडतर सैनिका प्रशिक्षण पूर्ण करून एका सामान्य नागरिकापासून कुशल सैनिक बनून भारतीय सेनेत दाखल होणार्या या युवा सैनिकांचे मी स्वागत करतो.कठीण परिश्रम व कठोर मेहनतीच्या आधारे प्रशिक्षण सफलता पूर्वक पूर्ण करणारे हे कुशल सैनिक आता ख-या अर्थाने आपल्या सैनिक जीवनाची सुरूवात करीत आहेत.सैनिक जीवनाचा एक टप्पा पार केला असला तरी आणखी बरेच काही शिकायचे आहे.उत्तम चारित्र्य,जोश,उत्साह व ईमानदारी ही चांगल्या सैनिकाची विशेषता असते.दीक्षांत संचलन परेडच्या वेळी या जवानांनी दाखविलेला जोश हा निश्चितच कौतुकास्पद आहे.प्रशिक्षणा दरम्यान त्यांना अनेक आव्हाने व कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे देखील प्रशिक्षण दिले जाते. शत्रूपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याबरोबरच सैनिकांना देशातील अंतर्गत समस्यांचा देखील सामना करावा लागतो.तसेच भूकंप,महापूर,अतिवृष्टी यासारख्या नैसिर्गक संकटात देखील दृढनिश्चय व मेहनतीने सैनिक धर्माचे पालन करण्याचे प्रसिक्षण सैनिकांना दिलेले असते.त्यामुळे हे युवा फौजी देशाची आन,बान आणि शान यासाठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देण्यासही तयार आहेत.खडतर प्रशिक्षण पूर्ण करून शपथग्रहण करणा-या या सर्व नौैजवान सैनिकांना आपल्या युनिटमध्ये जाण्यापूर्वी अॅडव्हान्स तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.