पद्मावती चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घालावी - आ. मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 10, नोव्हेबर - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करू नये व या चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी भाजपचे आ. मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. या संदर्भात श्री. लोढा यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रही पाठवले आहे.
पद्मावती चित्रपटामुळे धर्म व संस्कृती प्रेमी हिंदू समाजात मोठा संताप आहे. या चित्रपटामुळे सामाजिक भावना दुखवाण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यातील वातावरण बिघडू शक ते. त्यामुळे या चित्रपटावर तातडीने बंदी घातली जावी, अशी मागणी श्री. लोढा यांनी केली आहे.
भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेल्या व्यक्तींचे अयोग्य पद्धतीने चित्रीकरण करण्याची परवानगी कुणालाही दिली जाऊ शकत नाही. या चित्रपटावर बंदी घालावी. जेणेकरून मनोरंजनाच्या नावाखाली इतिहास व संस्कृतीचे अयोग्य पद्धतीने सादरीकरण करण्याची प्रवृत्तीला रोखता येईल, असेही श्री. लोढा यांनी पत्रात म्हटले आहे.