Breaking News

आपण काय करत आहोत, याचा कोणी विचार केला आहे का ? - कोहली

नवी दिल्ली : भारताच्या राजधानीवर गेला आठवडाभर दाट धुक्याचे राज्य पसरले आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार हे वातावरण निश्चितच प्रकृतीला धोकादायक आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने देशाच्या राजधानीतील नागरिकांना आरोग्यासंबंधीचा धोक्याचा इशारा दिला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही आता पुढाकार घेऊन दिल्लीतील नागरिकांना हवेतील प्रदूषण कमी करण्याचे आवाहन केले आहे. 


टीम इंडियाच्या कर्णधाराने ट्विटरवर म्हटले आहे, आपणा सर्वांना दिल्लीतील दाट धुक्याची कल्पना असेलच. ही परिस्थिती का ओढावली, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. कोहलीने प्रश्न उपस्थित केला आहे की, या वेळी आपण काय करत आहोत, याचा कोणी विचार केला आहे का ? क्रिकेटचे उदाहरण देताना त्याने म्हटले आहे प्रदूषणाविरुद्धचा हा सामना जिंकायचा असेल तर आपल्याला एकजुटीने खेळायला हवे. 

कारण हवेत प्रदूषण करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. ज्या व्यक्ती दिल्लीत राहतात त्यांची जबाबदारी मोठीच आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन विराट कोहलीने दिल्लीकरांना आवाहन केले आहे की, गरज असेल तरच मोटार गाड्यांमधून प्रवास करा. इतर वेळी बस, मेट्रो किंवा शेअर पद्धतीने ओला टॅक्सीचा वापर करा.