Breaking News

फिरोजशाह कोटला मैदानाच्या प्रवेशद्वाराला विरेंद्र सेहवागचं नाव

दिल्ली, दि. 02, नोव्हेंबर - राजधानी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानाला टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचं नाव देण्यात आलं आहे. सेहवागनेही या निर्णयाचं स्वागत  केलं आहे. कोटला मैदानाच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यात आलेला सेहवाग दिल्लीचा पहिलाच क्रिकेटर आहे.
कोटला मैदानाचं दुसर्‍या क्रमांकाचं प्रवेशद्वार सेहवागच्या नावाने ओळखलं जाणार आहे. सेहवागने काही माजी खेळाडूंच्या उपस्थितीत या प्रवेशद्वाराचं उद्घाटन केलं. डीडीसीएचा हा  सकारात्मक निर्णय असल्याचं सेहवाग म्हणाला. शिवाय येत्या काळात ड्रेसिंग रुम, स्टँड आणि प्रवेशद्वारांना इतर खेळाडूचं नाव देण्यात येईल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.  श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात यावं, अशी विनंती केली होती. मात्र तेव्हा दुसर्‍या कार्यक्रमाचं नियोजन होतं. त्यामुळे यापुढेही तुम्हाला असे  कार्यक्रम पाहायला मिळतील, असं सेहवाग म्हणाला.