राज्य अधिवेशनाला हमाल मापाडी रवाना
अहमदनगर :- हमाल - मापाडी व असंघटीत क्षेत्रातील कामागार अन्न, वस्त्र, निवारा शिक्षण आणि आरोग्य यापासून वंचित आहेत. कष्टकरी समाज असंघटित असल्याने मुलभूत हक्कांपासून वंचित राहत आहे. हमाल - मापाड्यांच्या अविशेनामुळे संघटनेला बळ प्राप्त होईल, असा विश्वास हमाला पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी व्यक्त केला आहे.
बीड येथे होणार्या राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या अधिवेशनासाठी हजारोंच्या संख्येने कामगार रवाना झाले आहेत. याप्रसंगी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, मधुकर केकाण, गोविंद सांगळे, कॉ.बाबा आरकडे, बाळासाहेब वडागळे, सतीष शेळके, भैरु कोतकर, सचिन ठुबे, लक्ष्मीाबाई कानडे आदी उपस्थित होते.
