Breaking News

गुरुजींचा शनिवारी मोर्चा

अहमदनगर जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती करणार आंदोलन 

अहमदनगर, दि. 02,  नोव्हेंबर - अहमदनगर जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने येत्या  शनिवारी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.  हा मोर्चा वाडीयापार्क येथून  सुरवात होऊन  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपन्न होणार आहे.
शासन स्तरावर प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित असतानाही शासनाने 23 ऑकटोबर रोजी   वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करुन प्राथमिक शिक्षकांना  कालबद्ध आर्थिक लाभ नाकारलेला आहे. शिक्षकांना पदोन्नत्तीची संधीच शिल्लक राहिली नसून  वेतन आयोगाने त्रिस्तरीय वेतन श्रेणीची शिफारस केल्यामुळे 1986  पासून वरिष्ठ  वेतन श्रेणीचा लाभ मिळत आहे परंतु या निर्णयामुळे 12   व 24  वर्ष सेवा पुर्ण झालेल्या कोणत्याही शिक्षकाला निवड श्रेणीचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे 1  नोव्हेंबर 2005  नंतरच्या शिक्षकांना जुन्या पेंशन सोबत वरिष्ठ श्रेणी नाकरलेली आहे. हे सर्व शासन जाणूनबुजून करत असून शासनाचा हा कुटील डाव आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी  प्रत्येक जिल्हास्तरावर मोर्चाचे आयोजन केले आहे अशी माहिती नारायण पिसे यांनी दिली. बदली हा कर्मचार्यांचा  सेवेचा भाग आहे परंतु शासनाचा सद्य निर्णय अन्यायकारक आहे.    कुठल्याही खात्यामध्ये आस्तित्वात नसणारी खोखो सारखी बदलीची पद्धत या शासनाने सुरु केली त्यामुळे शिक्षकांमध्ये  अविश्‍वासाचे वातावरण तयार झाले आहे. 
एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डीजीटल शाळा अशा प्रकारच्या विविध योजना पुढे करुन दुसरीकडे शिक्षकास ऑनलाईन कामात गुंतवरून द्यायचे असा प्रकार सध्या होत आहे.  असेही ते म्हणाले.