Breaking News

पाशा पटेल यांना आता राज्‍यमंत्री दर्जा


भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते पाशा पटेल यांना राज्‍यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. पाशा पटेल यांची राज्‍य कृषीमूल्‍य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली होती. या अध्यक्षपदाला राज्‍यमंत्री समकक्ष पदाचा दर्जा देण्यात आला आहे.

पाशा पटेल यांनी ग्रामीण महाराष्‍ट्रात विशेषत: शेतकरी पट्ट्यात भाजपाच्या विस्‍तारासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कृषीमूल्‍य आयोगाचे अध्यक्षपद देऊन व आता त्‍याला राज्‍यमंत्रीपदाचा दर्जा देऊन पक्षाने त्‍यांच्या कार्याची पोचपावती दिली आहे.