संविधानामुळे आपले जीवनमान उंचविण्यास मदत बाळासाहेब बारोटे यांचे प्रतिपादन
भारतीय संविधान दिनानिमित्त फकिरवाडा येथे संम्बोधी वसतीगृहात विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते काका शेळके यांच्यावतीने व्यायामाचे साहित्य देण्यात आले. याप्रसंगी विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, नगरसेविका कलावती शेळके, मुदस्सर शेख, सुनिल सोनवणे,बाळासाहेब भिंगारदिवे, विशाल वालकर, प्रतिक बारसे, अतुल हिवाळे,सुनिल हिवाळे, हर्षल म्हस्के, जनार्धन शेलार, रवी बोडखे, सागर खळे, एस.ए.सदाफुले, जयंत गायकवाड, डि.बी.बांगर, व्ही.एम.बैचे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी काका शेळके म्हणाले, संम्बोधी वसतीगृहातील विद्यार्थी आज आपले भविष्य घडवित आहेत. या विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, त्यांना व्यायामाची सवय लागावी व सुदृढ बनावे, यासाठी आपण हे साहित्य दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या साहित्याचा चांगला उपयोग करुन तंदूरुस्त रहावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी काका शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महापौर भगवान फुलसाँदर, संभाजी कदम, कलावती शेळके आदिंनी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना सर्वोतोपरि मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.ए.सदाफुले यांनी केले तर आभार जयंत गायकवाड यांनी मानले. याप्रसंगी डी.व्ही. शिंदे, पगार, सुमेध गायकवाड आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.
