Breaking News

कालिया मर्दनाची गरज

दि. 03, ऑक्टोबर - सत्तेची उब चाखण्याचे आकर्षण भल्याभल्यांना पागल करते. जिभेला  रक्त लागल्यांनतर एखादे हिंस्र जनावर शिकार करण्याचे उच्च पातळीवरचे धाडस करते.  हाच गुण अलिकडच्या राजकारण्यांमध्ये आहे तसाच उतरला असावा अशी शंका येण्या इतपत राजकारणाची पातळी घसरली आहे.सत्तेसाठी विद्यमान राजकारणी जनहिताची शिकार  करतांना कुठलीच लाज बाळगत नाहीत. अलिकडच्या पंचवीस वर्षापासून मुळ धरू लागलेली ही प्रवृत्ती आज कंबरेचेही फेकून देण्याइतपत निर्लज्ज बनली असून लोकांसाठी  अस्तित्वात आलेल्या लोक शाहीच्या छाताडावर नंगा नाच करीत आहे.
आघाडीच्या राजकारणाने सत्ताकारणात मांडलेला उच्छाद जनतेच्या आशा आकांक्षेचा जाहीर लिलाव करीत आहे.लोकशाहीच्या मंदिरात आडोशाला बसलेले हे साप राष्ट्राच्या सार्वज निक हितालाच दंश करू लागले आहेत.
विद्यमान राजकारण ज्या दिशेने जात आहे ते पाहील्यानंतर कुणाही देशभक्ताची  तळ पायाची आग मस्तकाला भिडल्याशिवाय राहणार नाही.माहाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर  लोकशाही आघाडी सरकार पाय उतार करून राज्यात महायुतीचा कारभार सुरू झाला.सत्तेचा प्रपंच करतांना महायुतीतील भाजपा आणि शिवसेना या दोन मुख्य घटक पक्षांमध्ये प हिल्या दिवसांपासून असलेले मतभेद तीन वर्षानंतरही कायम आहेत. सत्तेचा बंधही हे मतभेद संपवू शकला नाही. उलटपक्षी श्रेयवादाच्या अहंकाराने पोखरलेल्या राजकारणातून  मनभेदही विकोपाला गेले. आज या दोन्ही पक्षांची अवस्था घटस्फोट घेऊनही एकञ नांदणार्या नवरा बायको सारखी झाली आहे. दोघांच्या भांडणातून राज्य शासनाचा कारभार प्रभा वित होत नाही असे म्हणण्याचे धाडस ज्याला कळतं तो नक्कीच करणार नाही.
सत्ताधारी पक्षातील या मंडळींचे एकूण वर्तन पाहील्यानंतर राज्यातील जनतेच्या भाव भावनांशी जाणीवपुर्वक खेळ करण्याचा प्रमाद या मंडळींकडून केला जातो आहे.अपेक्षेने राज्याचा  कारभार हातात दिलेल्या जनतेच्या अपेक्षा पायदळी तुडवून आपल्या पोळीवर तुप ओढून घेण्याचा हलकटपणा राज्याच्या प्रगतीला शाप ठरला आहे. दिवसभर भांडायचे अन्  मावळतीला एकमेकांच्या कानात कुजबजत राञ पार करायची असले या मंडळींचे धंदे आहेत.
हे दोन्ही एकमेकांना भ्रष्टाचारी संबोधू लागले आहेत. सत्तेत माञ सारखे भागीदार. याचा अर्थ एकमेकाला साक्षी ठेवूनच त्यांचा भ्रष्टाचाराचा प्रवास सुरू असल्याचा निष्कर्ष काढणे सहज  सोपे आहे. जनतेला गृहीत धरून राजकारण्यांचा हा प्रपंच सुरू आहे. आम्ही कितीही नंगानाच केला, जनतेला कसेही मुर्खात काढले तरी मत देतांना कुठलीही कंजूषी होत नाही. हा  त्यांचा समज जनताच दृढ करीत आहे. म्हणूनच लोकशाहीच्या पिंढीवर बसून जनतेच्या हितावर फुत्कारणार्या या कालीयांचे मर्दन करण्यासाठी जनता रूपी कृष्णालाच सज्ज व्हावे  लागणार आहे.
गेल्या दोन दिवसापासून सोशल मिडीयावर एक मेसेज व्हायरल होतो आहे.त्याचा आशय असा ः
सासूः या कपबशा कुणी फोडल्या?
सुनः आमचे भांडण झाले.
दुसर्या दिवशी-
सासूः हा पलंग कसा तुटला?
सुनः राञी आमचे भांडण मिटले?
महाराष्ट्राचे राजकारण यापेक्षा वेगळे आहे का?....