Breaking News

पद्मश्री विखे यांच्या पुण्यस्मरणानिमित सत्संग सोहळा ; कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन


माजी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांच्या पूण्यस्मरणानिमित्त राहुरी फॅक्टरी येथे १००८ श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून ३१ डिसेंबर २०१७ रोजी भव्य सत्संग आयोजित करण्यात आला आहे. या नियोजित सोहळ्याच्या कार्यक्रम प्रत्रिका प्रकाशन सोहळा गुरुवारी {दि.१६} घोलप मंगल कार्यालयात शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
‌ तालुक्यातील जय बाबाजी भक्त परिवार याच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील मंगल कार्यालयात पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत सत्संग, प्रवचन व महाप्रसादवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अॅड.सुभाष पाटिल, पद्मश्री विखे कारखान्याचे अध्यक्ष डाॅ सुजय विखे, तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटिल, चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड याच्या सह जय बाबाजी परिवाराचे भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

‌ कार्यक्रम पत्रिकेचे पूजन व प्रकाशन गुरुवारी राहाता शहरातील घोलप मंगल कार्यालयात शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गणेशराव भांड, भाऊसाहेब पगारे, पत्रकार शिवाजी घाडगे, गंगाधर डोखे, श्रीकांत जाधव, विजय लोखंडे, किशोर लोखंडे आदिसह राहुरी, राहाता, कोपरगाव तालुक्यातील जय बाबा भक्त परिवार उपस्थित होता.‌