अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कुलला पुरस्कार
विद्यार्थ्यांच्या व्यक्तीगत गुणांना परिपूर्ण वाव देतांना विविध उपक्रमांचे आयोजन करणार्या आमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कुलला गुणवत्तेचा आदर्शशाळा हा पुरस्कार नुकताच मिळाला. विद्यार्थ्यांनी रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत सुवर्ण पदक तसेच १० विद्यार्थ्यांना राष्ट्रभाषा पुरस्कार मिळाले, अशी माहिती प्राचार्य जे. बी. शेठी यांनी दिली.
अमृतवाहिनी संस्थेच्या विशस्त संचालिका शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कुल ने गुणवत्तेबरोबर उत्कृष्ठ निकाल, खेळ व सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये जिल्हा पातळीवर घवघवीत यश मिळविले आहे. निसर्ग रम्य परिसर, स्वच्छता, टापटीप, भव्य क्रीडांगण या बरोबर शाळेच्या सातत्यपुर्ण उकृष्ठ कामाबद्दल आदर्श शाळा म्हणून अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कुलला गौरविण्यात आले आहे.
मदर तेरेसा बालकल्याण सोसायटीअंतर्गत रंगभरण स्पर्धेत गुरुप्रीत डंग, आदित्य गुंजाळ, संस्कार जोर्वेकर, आर्यन कोल्हाळ, सर्वेश चतुर, श्रेया जोर्वेकर, प्रनुतन पाटील, साई काकड, साईनाथ कासार, अंशु तासिलदार व हस्ताक्षर स्पर्धेत जान्हवी वैद्य, प्रांजली आढाव, शब्दाली गुदादे, शांभवी सराफ, पायल ढोबळे यांना सुवर्ण पदक मिळाले आहे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रभाषा हिंदी स्पर्धेत जि-ााना सोनवणे, मनीष शर्मा, राशी बाहेती, तन्वी हासे, परमेश्वर कुमावत, ओमकार कानवडे, रिया भोसले, शरयु शेळके, अदवैत लांडगे, सृष्टी घाडगे यांना राष्ट्रभाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या विद्यार्थ्यांना निलीमा जाधव, कासार, कडलग या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राज्याचे माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ.सुधीर तांबे, उपाध्यक्ष बाळासाहेब पा.गुंजाळ, अॅड. आर. बी. सोनवणे, संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर व्हि. बी. धुमाळ, प्राचार्य के. जी. जाधव यांनी अभिनंदन केलेे आहे.