दुर्मिळ चातक पक्षाचे विद्यार्थ्यांनी वाचविले प्राण..!
पक्षी अगदी शुद्ध हरपला होता परंतु पोटाच्या हालचालीवरून त्याच्यात अजुन प्राण असल्याचे समजत होते.काही वेळ सुरक्षित व शांत ठिकाणी ठेवुन त्यास थेंब-थेंब पाणी पाजण्यात आले.हळुहळु तो धक्यातुन सावरून शूद्धीवर आला.त्यानंतर शिक्षक अंबेटकर यांनी पक्षीअभ्यासक जयराम सातपुते यांना संपर्क करून व फोटो पाठवुन मार्गदर्शन घेतले व त्याप्रमाणे उपचार केले.
तो पक्षी चातक पक्षी असुन गेल्या ८वर्षांपासुन केलेल्या जिल्हास्तरीय पक्षीगणनेनुसार या पक्षाची नोंद अहमदनगर जिल्ह्यात अद्यापपर्यंत झाली नसल्याने अंबेटकर सर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी चातकपक्षाचे वाचवलेले प्राण हे निसर्गसंवर्धनात अतिशय महत्वाची गोष्ट असल्याचे सातपुते यांनी सांगितले.
आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने शिक्षक देवेंद्र अंबेटकर,हर्षल घायतडक व प्रदिप साळवे आदीच्या प्रसंगावधान व भुतदयेमुळेच चातक दोन दिवसांच्या उपचारानंतर पुन्हा आकाशभरारी घेवु शकला. चातक या पक्षाचे इंग्रजी नाव पाईड कुकू असुन हा कोकिळ कुळातील आहे. याच्या विणीचा हंगाम जून ते ऑगस्ट असतो.याचे स्वतःचे घरटे नसते.कोकिळ पक्ष्यांप्रमाणे चातकाची मादी आपले अंडे दुसऱ्या एखाद्या पक्ष्याच्या घरट्यात टाकून निघून जाते. चातकाच्या पिलांची देखभाल ते उसने आई-वडील करतात