Breaking News

रॅगिंग सहन करणे हे रॅगिंग करण्यापेक्षाही मोठा गुन्हेगार ठरतो; दिवाणी न्यायाधीश ए. आर. माळवदे .

मिरजगाव /प्रतिनिधी /- रॅगिंग सहन करणे हे रॅगिंग करण्यापेक्षाही मोठा गुन्हेगार ठरतो. त्यामुळे आपल्यावर अत्याचार होत असल्यास त्याविरोधात तक्रार करणे गरजेचे आहे. यासाठी प्राचार्य, संस्थानिक, व पोलिसांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. कारण धनदांडग्याची मुले शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात येत नाहीत. तर केवळ मजा मारण्यासाठी येथे येत असतात. असे वक्तव्य दिवाणी न्यायाधीश ए. आर. माळवदे यांनी व्यक्त केले आहे.



मिरजगाव येथील महात्मा फुले नूतन महाविद्यालयात कायदेविषयक माहिती व मार्गदशन शिबिरात ते बोलत होते. ते म्हणाले की शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुलांना आशा चुकीच्या गोष्टी करण्यात स्वारस्य नसते.त्यामुळे खंबीरपणे पुढे येवून तक्रार करण्यानेच अश्या घाणेरड्या प्रकारांना आळा बसू शकतो. आशा गुन्हासाठी दोन वर्षांचा कारावास व दहा हजार रुपये दंड करण्यात येत असून त्या अशा विद्यार्थ्यानां कोणत्याही शालेय संस्थेत पाच वर्षे पुन्हा प्रवेश देण्यात येत नाही. तेव्हा शालेय विद्यार्थ्यांनी धाडसाने पुढे येणे गरजेचे आहे.

यावेळी दिवाणी न्यायाधीश डी. जे. पाटील, प्रांताधिकारी अर्चना नष्ठे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अदिनाथ चेडे, कर्जत बार असोशियनचे अध्यक्ष अॅड बाळासाहेब बागल, अॅड उत्तमराव नेवसे, अॅड. शिवाजीराव गुंजाळ, अॅड. अनिल म्हेत्रे, अॅड. शफिक शेख, अॅड बाळासाहेब टकले, उत्तमराव बावडकर, प्राचार्य बबनराव खराडे, प्राचार्य एस एन गंभिरे, दत्ता भांडवलकर, ए. आर. वीरपाटील महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.

यावेळेस .शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या शंका विचारल्या असता त्यांची पाहुण्यांनी समर्पक उत्तरे दिली अॅड. अभय खेतमाळस यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा.तानाजी जाधव यांनी सुत्र संचालन केले आभार प्राचार्य डॉ. एस. एन.गंभिरे यांनी मानले.