डॉ. विष्णू मगरे मुंबई विद्यापीठाचे नवे प्र-कुलगुरु
मुंबई, दि. 10, नोव्हेबर - दादरच्या किर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू मगरे यांची मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्य। कु लगुरूपदी डॉ संजय देशमुख यांची हकालपट्टी केल्यानंतर डॉ. मगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मगरे यांच्या नियुक्तीचे आदेश कुलपतींनी दिले आहेत.
वारंवार डेडलाईन देऊनही निकाल वेळेवर न लावल्याने देशमुख यांची हकालपट्टी करण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले होते.
मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल यंदा बराच काळ रखडले होते. देशमुख यांनी ऑनलाइन पेपर तपासणीचा घाट घातल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, या प्रयोगात विद्यापीठाला पूर्णत: अपयश आले. परीक्षा होऊन 45 दिवसांची मुदत उलटल्यानंतर विद्यासागर राव यांनी पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी 31 जुलैची अंतिम मुदत दिली होती. मात्र, या मुदतीतही विद्यापीठाला पेपर तपासणीचे काम पूर्ण करता आले नाही. 31 जुलैची मुदत पाळण्यात विद्यापीठाला अपयश आल्यानंतर देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.