Breaking News

सिलेंडरमधील गॅस काढून विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश

मुंबई, दि. 10, नोव्हेबर - ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराष्ट्र नगरमध्ये सिलेंडरमधील गॅस काढून छोट्या बाटल्यांमध्ये भरून विकणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला  आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली. 23 सिलेंडर, छोट्या बाटल्या आणि टेम्पो असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही टोळी  छोट्या बाटल्यांमध्ये गॅस भरून सोनार, गॅस वेल्डिंग, एसी दुरुस्ती करणार्‍यांना विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक के ली.