Breaking News

पाथर्डी तालुक्यात गाड्या चोरीचे सत्र सुरूच.


पाथर्डी शहरासह तालुक्यामध्ये अनेक दिवसांपासून गाड्या चोरीचे सत्र सुरूच आहे.शहारामध्ये एस.टी.स्टँड परिसर ,आठवडे बाजार, गर्दीच्या ठिकाणी चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्रीच्यावेळी दुकाने तसेच घरफोडीचे प्रमाण वाढले आहेत.

दरम्यानच्या काळामध्ये दुचाकी वाहनचोरांचा मोठा सुळसुळाट झालेला आहे.मात्र या कडे पोलीस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे.मागील महिन्या मध्ये अनेक दुचाकींची चोरी झाली.त्या मध्ये भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांची नवी आणलेली बुलेट गाडी चोरीस गेली होती.

 तसेच सेन्ट्रल बँकेबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा असताना देखील बँकेतील कर्मचारीची स्प्लेंडर गाडीची चोरी झाली.मात्र पोलिस स्टेशन ला फिर्याद दाखल करून सुद्धा चोरी गेलेल्या वाहनाचा शोध लागत नाही.तसेच मोबाईल चोरीच्या बाबतीत सुद्धा घडताना पाहायला मिळत आहे आठवडे बाजार म्हणजे मोबाइल चोराला मोठी पर्वणीच असते. सर्रासपने बाजारातून महागडे मोबाइल चोरीला गेल्याच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात व त्याचे प्रमाण सातत्याने वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकानमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

तालूक्यातील पगोरी पिंपळ गाव येथे मोठी जत्रा भरते.जत्रेमध्ये तालुक्यासह परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक वाहने घेऊन येतात.शुक्रवार दि. 10/11/2017 रोजी रात्री 11 वाजता मुक्ताजी ज्ञानदेव मिसळ यांची दुचाकी स्पेडर गाडी (क्रं एम.एच.१७ ऐ आर ०४११) पागोरी पिंपळगाव येथून चोरीला गेली आहे.त्यांनी पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद दाखल केली आहे.मात्र त्यांना गाडीचा योग्य तो तपास होऊन गाडी कधी मिळेल हे कोणालाही सांगता येत नाही.

या चोरीच्या घटनांनी पोलिसासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.पाथर्डी पोलीस प्रशासनाने गुन्हे कमी होण्यासाठी छोट्या मोठ्या भुरट्या चो-या कमी होण्यासाठी आता काहीतरी ठोस पाऊले उचलावीत. तालुक्यातील नागरिकांना या वारंवार होणाऱ्या छोट्या मोठ्या चोरीच्या घटनांमधून दिलासा मिळवा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे