जामखेड बस स्टँडला आढळला बेवारस मृतदेह
जामखेड एसटी बस्थानकात एक बेवारस मृतदेह बाकावर पडलेला होता अशी खबर पोलीस कडून चार वाजता सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मिळाली. त्यानंतर संजय कोठारी हे आपल्या स्वताच्या ऍम्ब्युलन्स स्वतः बस स्थानकावर पोहचले. मृतदेह उचलण्याची लगबग करू लागले. मात्र या ठिकाणी त्यांच्या मदतिला एस्टीचा कोणताही कर्मचारी अथवा अधिकारी पुढे सरसावला नाही.
त्यानंतर त्यांनी स्वतः मृतदेहास आपल्या गाडीत टाकुन एकट्यानेच ग्रामीण रूग्णालय येथे आणले. सरकारी दवाखन्यातील कर्मचाऱ्यांनी देखील मृतदेह उतरवण्यास कोठारी यांना कसलीच मदत केली नाही. शिवाय पोस्टमार्टम रुमची चावीच त्यांच्या हातात दिली. आणि म्हणाले की तुम्हीच मृतदेह ऊतरुन घ्या.
त्यांनी घटनेची तिव्र नाराजी व्यक्त केली. संजय कोठारी यांनी दैनिक लोकमंथन च्या प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केली आहे. सोशल मिडीयावर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्हायरल केलेला मृत देहाचा फोटो,आणी माहीती पाहुन मयताचे नातेवाईक मयताचा भाचा आजित देवींचंद कांकरिया ( मु. पो. पाटोदा )यांनी ते आपले मामा चंदन गुलाबचंद चोपडा( रा.कळंब,जि उस्मानाबाद) येथील असुन गेल्या वीस वर्षापासुन बेपत्ता असल्याचे सांगितले.

दि. 13/11/2017 ला राञी 12 वाजता जामखेडला सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना भेटले. ग्रामीण रुग्णालयात जाऊन मतृदेहाची पहाणी करुन ते आपलेच मामा आसल्याचे सांगीतले. दिनांक 14/11/2017 सकाळी येवुन रितसर पंचनामा पोलीस हेड कॉ. बी. आय. गव्हाणे. ए. व्हि. बडे करुन वैद्यकिय आधिकारी डॉ. लामतुरे यांनी पोस्टमार्टम करुन ताबडतोब मृतदेह ताब्यात दिला.
डॉक्टर लामतुरे आणी पोलीसांनी फार मदत केली असे कोठारी म्हनाले या अंत्यविधिस सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी पाटोद्याला गेले अ सता तेथील ऊपस्थीतांनी आदर्श कार्याचे भरभरून कौतुक केले. मगंळवारी नातेवाईकाच्या वतीने पाटोदा येथे शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
यावेळी मयताची 84 वर्ष वयाची बहीन भाऊ मिळाला म्हणुन समाधानी तर तोच मयत झाल्याने दुखी आसे सुख-दखाचे आश्रू गाळत होत्या शेवटी बहीन भावाची भेट झाली ती अशी. अंत्यविधीस सुभाष भंडारी, नरेंद्र कांकरिया, मिठ्टुलाल कांकरिया, संजय कांकरिया, सतीष कांकरिया, संभाजी जाधव, मदन दुग्गड, आप्पासाहेब राख, राहुल कांकरिया, अजित कांकरिया, दिलीप कांकरिया, अब. चौरे, प्रशांत देशमुख, छगन मुझे, महेंद्र नागरगोजे, विजय जोशी आदी मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते-