दगडूशेठ गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी
पुणे, दि. 08, नोव्हेंबर - ओम गं गणपतये नम: गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...अशा गणेशनामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून निघाला. वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभार्यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली सजावट आणि विद्युतरोषणाईने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी गायनसेवा दिली. त्यानंतर विशेष गणेशयाग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, राजेश सांकला, बाळासाहेब सातपुते यांसह विश्वस्त उपस्थित होते. सुभाष सरपाले आणि 125 सहकार्यांनी सलग 5 दिवस काम करुन तब्बल 10 हजार किलो फुलांची आकर्षक आरास साकारली होती.
भाविकांकरता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. अगदी श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या अलिक डेपर्यंत रांगा लागल्या होत्या. गणेशचरणी आरती अंकलीकर-टिकेकर यांनी शास्त्रीय संगीत, भावगीते आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून केलेल्या स्वराभिषेकाचे साक्षीदार होण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. मंदिरावर आकर्षक तोरण आणि रांगोळ्यांची सजावट देखील करण्यात आली होती.