एटीएमधारकांना फसवणा-या आंतरराज्यीय टोळीला छत्तीसगडमधून जेरबंद
औरंगाबाद, दि. 03, ऑक्टोबर - एटीएमधारकांना फसवणा-या आंतरराज्यीय टोळीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी छत्तीसगडमधून अटक केली असून या टोळीने वेगवेगळया राज्यात शंभरहून अधिक गुन्हे केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली. दिल्ली आणि हरियाना येथे राहणारे चार आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून त्यांचे दोन साथीदार पसार आहेत.या आरोंपीकडे पत्त्याच्या डावापेक्षा अधिक एटीएम कार्ड सापडले.
वैजापुरचे एक अधिकारी रेल्वेस्टेशन रोडवरील एका एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने त्यांचे एटीम कार्ड घेवून त्यांना दूसरे कार्ड दिले. परत एकदा पैसे काढण्यासाठी ते एटीएमवर गेले असता कार्डची आदलाबदल झाल्याचे त्यांना समजले त्यांच्या कार्डचा वापर करून 77 हजार रूपये काढण्यात आले होते. पोलिसांत त्यांनी तक्रार केली तपासात एटीएम सेंटरमधील सीसीटिव्हीत आरोपी स्पष्ट दिसला. सायबर क्राईम सेलच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचे मोबाईल नंबर मिळविले. ही व्यक्ती रायपूरमध्ये असल्याची खबर मळिताच पोलिसांनी तेथे जावुन त्यांना अटक केली य शैलेंद्रसिंग घिसाराम (42,रा.सुलतानपुरी, दिल्ली), विनोदसिंग गजेंसिंग (25),पालराम गंजेसिंग(32,दोघे रा. लोहारी, हिस्सार, हरियाणा) आणि राजेश सतबिरसिंग (25,रा. सुलेमाननगर, दिल्ली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत आरोपींकडे विविध बँकांची एटीएम कार्ड होते.