Breaking News

ग्रामदूत योजनेसाठी बीड जिल्ह्यातील आठ गावांचा समावेश

बीड, दि. 03, ऑक्टोबर - ग्रामदूत योजनेसाठी बीड जिल्ह्यातील आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे. परळी, अंबाजोगाई, केज आणि धारूर या चार तालुक्यातील निवडक  आठ गावांचा या योजनेत समावेश केल्यानंतर आता संबंधित गावांचा कायापालट करण्यासाठी या योजनेअंतर्गत निवडलेल्या गावांना प्रतिवर्षी सुमारे एक ते दीड कोटी रुपये विक ासासाठी मिळणार आहेत. ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आले असून विकास आराखडा तयार केल्यानंतर या गावच्या विकास कामांना  सुरुवात होणार आहे.