लोकमंगल’ने कोंडी फोडूनही दराबाबत कारखानदारांची चुप्पी
’लोकमंगल’ने एफआरपी अधिक 300 आणि 100 रुपये असा दर इतर कारखानदार देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ऊसदरावरून 15 दिवस संघर्ष केलेल्या शेतकरी संघटनाही कारखानदारांच्या भूमिकेवर शांतच आहेत. शेतकरी संघटनांच्या आक्रमक आंदोलनानंतर लोकमंगल कारखान्याने एफआरपी अधिक 300 महिन्यानंतर 100 रुपये असा फॉर्म्युला जाहीर करून ऊसदराची कोंडी फोडली. हा फॉर्म्युला आम्हाला मान्य नसल्याची भूमिका कारखानदारांनी घेतली. इतर कारखानदारांसोबत आम्ही चर्चा करून दर जाहीर करू, असे सांगितले.
’लोकमंगल’ने 2250 रुपयांची पहिली उचल तर जकराया कारखान्याने 2500 रुपयांची पहिली उचल जाहीर तर केलीच शिवाय पहिला हप्ता दिलाही. प्रत्यक्षात उसाचे गाळप सुरू असतानाही कारखान्यांकडून पहिल्या उचलीची घोषणा केली जात नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आठवड्याची मुदत दिली आहे, जे कारखाने लोकमंगलने दिलेला दर देत नाहीत, त्यांच्या कारखान्यांसमोर आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले.