Breaking News

विराटला काही काळ क्रिकेटपासून दूर राहून विश्रांतीची गरज - सेहवाग.

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने विराटला एक सल्ला दिला असून विराटला काही काळ क्रिकेटपासून दूर राहून विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्याने या काळात भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्माकडे सोपवावी, असेही सेहवागने म्हटले आहे. 


भारत आगामी काळात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे कर्णधार विराट कोहलीने या दौऱ्यापूर्वी विश्रांती घेणे आवश्यक आहे. कोहलीने त्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांचे नेतृत्त्व रोहित शर्माकडे सोपवावे. 

जेणेकरू कोहलीला या काळात आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवता येईल. महेंद्रसिंह धोनी कर्णधार असतानाही त्याने अशाप्रकारचा ब्रेक घेतला होता. त्यावेळी त्याने संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी गौतम गंभीरच्या खांद्यावर दिली होती. कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्मा उत्तमपणे पार पाडेल, असा विश्वास यावेळी सेहवागने व्यक्त केला.