श्रीलंकन टीम भारतात दाखल
मुंबई, दि. 09, नोव्हेंबर - दिनेश चंडिमलच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळण्यासाठी भारत दौर्यावर दाखल झाला आहे. श्रीलंका संघ भारत दौर्यात तीन कसोटी सामन्यांसह तीन वन डे आणि तीन ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतही खेळणार आहे.
श्रीलंका संघाचा मुक्काम कोलकात्यात असून, भारत दौर्यातल्या त्यांच्या पहिल्या कसोटी सामन्याला 16 नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरुवात होईल. विराट क ोहलीच्या टीम इंडियानं नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौर्यात यजमानांवर तिन्ही फॉरमॅट्समध्ये क्लीन स्विप साजरा केला होता. त्यामुळे मायदेशातल्या आगामी मालिकेतही टीम इंडिया निर्विवाद वर्चस्व गाजवेल, अशी अपेक्षा आहे.