Breaking News

तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी फेंगशुई तज्ज्ञाला अटक

मुंबई, दि. 02, नोव्हेंबर - थेरपीच्या नावाखाली वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करणार्‍या प्रख्यात फेंगशुई मास्टर आणि क्रिस्टल थेरपिस्ट चारुहास नाईक याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाईक यांचा घोडबंदर रोडवर फ्लॅट आहे. पीडित मुलगी मुलुंडमध्ये राहत असून वडील सीए आहेत. तर आई शास्त्रज्ञ आहे. पीडित मुलगी डिप्रेशनमध्ये गेल्याने नाईक हा तिच्यावर क्रिस्टल थेरपी करत होता. या थेरपीमुळे तिच्या बदल होत होता. त्यामुऴे 30 ऑक्टोबर रोजी तरुणी पुन्हा थेरपी करण्यासाठी आईसोबत गेली होती. मात्र आईने मुलीला त्याठिकाणी सोडले आणि अन्य कामासाठी निघून गेली. यावेळी नाईकने संधीचा फायदा घेत मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.