नवी मुंबई, दि. 18, नोव्हेंबर - जुईनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या दरोड्या प्रकरणी संशयीत दोन जणांना नवी मुंबई पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. बँकेवर दरोडा टाकणारे दरोडेखोर ज्या गाड्यांमधून पसार झाले त्या गाड्यांचे क्रमांक पोलीसांच्या हाती लागले नव्हते; मात्र पोलीसांनी गाड्यांच्या वर्णनावरून टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज व अन्य ठिकाणाहून या गाड्यांची माहिती काढली. त्यांनतर माहिती काढून पोलीसांनी दोन जणांना गोवंडीतून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यांची पोलीस कसून चौकशी करत असले, तरी अद्याप एकाही पोलीस अधिका-यांने याबाबत अधिकृत दुजोरा दिला नाही.