सिंधुदुर्गनगरीत पत्रकारांचे धरणे आंदोलन
सिंधुदुर्गनगरी, दि. 17, नोव्हेंबर - पत्रकाराना पेंशन मिळावी, सभागृहात मंजूर पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी या आणि अश्या आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय पत्रकार दिनादिवशीच काळ्या फिती लावत पत्रकारानी सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा धिकारी उदय चौधरी याना सादर करत आपल्या मागण्यांकडे शासनाच लक्ष वेधलं आहे.
16 नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकार दिन. मात्र गुरुवारी या दिवशीच आपल्या मागण्यंकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी पत्रकारानी धरणे आंदोलन केले. मराठी पत्रकार परिषदेचे कार्यध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आल.

पत्रकाराना पेंशन मिळावी, सभागृहात मंजूर पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, द्वैवार्षिक पडताळणीच्या नावाखाली छोट्या वृत्तपत्राची गळचेपी थांबवावी,मजेठीया वेतन आयोगाच्या शिफरशींची अंमलबजावणी करावी या मागण्यांच निवेदन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना देण्यात आल.