Breaking News

राहुरी फॅक्टरी येथे शनिवारी रक्तदान शिबिर


येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने शनिवार १८ नोव्हेबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठान अध्यक्ष मछिन्द्र दौंड यांनी दिली. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात वैष्णवी चौक अग्रेसर आहे. 

नुकताच नवरात्र उत्सव वैष्णवी चौक येथे पार पडला. या कलावधित जिल्ह्यातील मान्यवरानी भेटी देवून प्रतिष्ठानचे कौतुक केले. सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठानचे मार्गदर्शक वसंत कदम यांच्या जन्मदिवसानिमित्त शनिवार १८ नोव्हेबर रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत रक्तदान शिबीर संपन्न येणार आहे. या रक्तदान मोहिमेत परिसरातील युवक व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानने केले आहे.