Breaking News

खा. रक्षा खडसेंची अतिदुर्गम आदिवासी गावांना भेट

जळगाव, दि. 10, नोव्हेबर - खा. रक्षा खडसे यांनी अतिदुर्गम भाग समजल्या जाणार्‍या रुईखेड, साकदेव, माथन व मोहमांडली या अतिदुर्गम भागातील आदिवासी गावांना नुकतीच  भेट दिली. या गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या गावांमध्ये मूलभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन, असे आश्‍वासन खा. रक्षा खडसे यांनी  ग्रामस्थांना दिले.
यावल तालुक्यातील रुईखेड, साकदेव, माथन या यावल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बंधूभगिनींची भेट रक्षा खडसे यांनी घेतली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या  गावाला भेट देणारे पहिले खासदार अशा शब्दात त्या आदिवासी बंधूनी रक्षा खडसे यांचा गौरव केला. खा. खडसे यांनी या गावातील आदिवासी बंधूभगिनींच्या अडचणी समजून  घेतल्या.