कर्जबाजारीपणास कंटाळून शेतक-याची आत्महत्या
बीड, दि. 03, ऑक्टोबर - कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 45 वर्षीय शेतक-याने गळफास घेवून आत्महत्या केली. सातेफळ येथील बाबुराव चंद्रसेन घाडगे वय 45 वर्षे असे या शेतक-याचे नाव आहे. या कर्जाला कंटाळून त्याने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती युसूफ वडगाव पोलीस ठाण्याला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या शेतक-याच्या पश्चात मुले, मुली, पत्नी असा परिवार आहे.
