Breaking News

ई-बांधकाम परवानगी आणि स्वच्छ सर्वेक्षण कार्यशाळा उत्साहात

कोपरगाव नगरपरिषदेच्यावतीने शहरातील व राहाता नगरपरिषद हद्दीतील बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक व इंजिनिअर यांची ई-बांधकाम परवानगी व स्वच्छ सर्वेक्षण- २०१८ बाबतच्या कार्यशाळेचे आयोजन दि. १५ रोजी सकाळी येथील पार्श्वनाथ हाईट्स, बँक रोड, कोपरगांव येथे करण्यात आले होते. 


या कार्यशाळेमध्ये महा.आयटी कंपनीचे अधिकारी यांनी ई-बांधकाम परवानगी वगैरे कामाचे प्रशिक्षण दिले. तसेच मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी स्वच्छ भारत अभियानाचे महत्व समजावून स्वच्छतेची शपथ दिली.

या प्रसंगी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, नगर अभियंता विजय पाटील, महा.आयटी कंपनीचे अधिकारी पुरूषोत्तम गोलेगांवकर, राजेश गाढे सहा. कार्यालय पर्यवेक्षक, उदय पाटील, गणेश आहिरे, गणेश म्हस्के, विलास गीते स्वच्छता समन्वयक शशांक डांगे, विद्युत अभियंता आदी उपस्थित होते.