Breaking News

जैन इरिगेशनला 56 कोटी रुपयांचा नफा

जळगाव, दि. 16, नोव्हेंबर - भारतातील कृषि व सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2017-18 च्या दुसर्‍या तिमाहिचे स्वतंत्र व एकत्रित निकाल मुंबई येथे नुकतेच जाहीर केले. 


कर, व्याज व घसारापूर्व नफा 15 टक्के अर्थात भारतीय रुपये 2,190 दशलक्ष इतक ा राहिला आहे, तर अर्धवार्षिक करपश्‍चात नफा 56 कोटी रुपयांचा नफा झाल्याचे नोंदविले आहे. यात सूक्ष्मसिंचन प्रकल्प व्यवसाय 40 टक्क्यांनी तर पीव्हीसी शीट व्यवसाय 46 टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

गुजरातमध्ये पाईप्सच्या पुरवठा व स्थापना करण्यासाठी 1,784 दशलक्ष रुपये मूल्याची मागणी नुकतीच प्राप्त केली. होंडूरासच्या कृषी मंत्रालयाकडून नुकताच प्लास्टिक पाईपचे जाळे उभारण्यासाठी संरचना नियोजन, पुरवठा, प्रस्थापन यांचे कार्यान्वयनकरण्यासाठी 24 दशलक्ष यू.एस. डॉलर्सची मागणी करार प्राप्त केला.