Breaking News

नेस्ले इंडियाला 45 लाख रुपयांचा दंड


उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर जिल्हा प्रशासनाने नेस्ले इंडियाला आणि कंपनीच्या वितरकांना दंड ठोठावला आहे. नेस्लेचे प्रसिद्ध उत्पादन असलेला नुडल्स ब्रॅण्ड मॅगी प्रयोगशाळेतील तपासणी पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याने ही कारवाई करण्यात आली. नेस्ले इंडियाला 45 लाख रुपये, तीन वितरकांना 15 लाख आणि दोन विक्रेत्यांना 11 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जिल्हा प्रशासनाने नोव्हेंबर 2016 मध्ये नमुने गोळा केले होते आणि प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या चाचणीवेळी मानवाला पचनापेक्षा जास्त प्रमाणात राखेचे प्रमाण सापडले होते. आपल्याकडे अजून कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नसून ती मिळाल्यानंतर आव्हान देण्यात येईल. राख असणारे नमुने हे 2015 मधील आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले.