Breaking News

राष्ट्रवादी युवकचा 27 रोजी सातार्‍यात मोर्चा

सातारा, दि. 14, नोव्हेंबर - सातारा जिल्ह्यातील वाढते भारनियमन परिणामी शेतीवर झालेला परिणाम याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सोमवार, दि. 27 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी दिली. 


शरद पवार यांच्या नागरी सत्कार सोहळ्याची अंतिम तयारी करण्यासाठी रविवारी राष्ट्रवादी भवनात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. आ. शशिक ांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, स्वप्निल डोंबे आदी यावेळी उप स्थित होते.
तेजस शिंदे म्हणाले, पुढील आठवड्यात संपूर्ण सातारा जिल्ह्याचा दौरा करण्यात येणार असून एक हजार नवीन शाखा स्थापन करणार आहे. शासन तीन वर्षांच्या केलेल्या कामाचा खोटा डंका वाजवत असून त्यांच्या खोट्या जाहिरातीच ते सिध्द करत आहे. नव्वद टक्के वीजबिल भरल्यानंतर वीज खंडित केली जात आहे. सातारा जिल्ह्यात 15 हजार जोडण्या प्रलंबित आहेत. नवीन उपकेंद्र सुरु केलेली नाहीत. याउलट विदर्भात कामे जोरात सुरु केली आहेत.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीचा सातारा जिल्हा बालेकिल्ला असून शरद पवारांच्या सत्कार सोहळ्यात आपण सारेच एकत्रित आहोत. सामान्य जनतेच्या प्रश्‍नांसाठी आपल्याला रस्त्यावर उतरायचे आहे. युवकांच्या समस्या आहेत. वाढती बेरोजगारी आहे. महावितरणला जाग आणण्यासाठी कृष्णानगर येथील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. 

त्यामध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या बैठकीस प्रतीक कदम, महेश जाधव, मंगेश ढाणे, नितीन शिंदे, पारिजात दळवी, विजय कुंभार, शुभम साळुंखे, प्रवीण देशमाने, अजित भोसले, अमित पाटील, राजकुमार जगदाळे, मल्लेश मुलगे, गणेज जगताप, नारायण अहिवळे, अमर शिंदे, समीर राजेघाटगे, विक्रांत शिर्के, संग्राम शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.