Breaking News

पहिला हप्ता म्हणून 2200 ते 2300 रुपये दिले जाण्याची शक्यता

सोलापूर, दि. 06, नोव्हेंबर - राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यात ऊस दरावरून शेतकरी संघटना कारखानदार यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 1 नोव्हेंबरपासून 25 पेक्षा कारखान्यांनी गळीत हंगामाचा शुभारंभ केला असताना दुसरीकडे शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनामुळे शेतकरी कारखान्यांना ऊस देण्यास विरोध करीत आहे. पांडुरंग कारखान्याचे अध्यक्ष सुधारक परिचारक वगळता एकाही कारखानदारांनी एफआरपीची रक्कम जाहीर केली नाही. इतर कारखान्यांपेक्षा अधिक दर देण्याची आश्‍वासन दिले आहे. ज्येष्ठ आमदार कारखानदार यांनी मात्र कारखान्यांची सध्याची स्थिती पाहता एफआरपीपेक्षा अधिक दर एकाही कारखान्यांना शक्य नसल्याचे स्पष्ट करीत पहिला हप्ता म्हणून 2200 ते 2300 रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली. जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर्स, सहकारमहर्षी, जकराया शुगर्स, युटोपियन शुगर्स, विठ्ठल कॉर्पोरेशन, लोकनेते, सासवड माळी शुगर्स, संत दामाजी कारखाना, बबनराव शिंदे शुगर्स, संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना, मातोश्री शुगर्स, सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना, मकाई सहकारी, भीमा सहकारी, विठ्ठलराव शिंदे सहकारी, आदिनाथ सहकारी या कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली आहे. यामध्ये पांडुरंग साखर कारखान्याने एफआरपीनुसार दर देण्याचे जाहीर केले तर जकराया शुगर्सने 2500 तर भीमा कारखान्याने 2600 रुपये दर देण्याचे गाळप शुभारंभावेळी जाहीर केले आहे. कारखानदारांचा70:30 चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता एफआरपीदरापेक्षा अधिक दर देण्याची शेतकरी संघटनेची मागणी अवास्तव आहे. जिल्ह्यात उसाला रिकव्हरी कमी आहे. यामुळे काही कारखाने वगळता एफआरपीनुसार दर देणे अनेक कारखान्यांना शक्य नाही. यामुळे कारखानदारांची दर देण्याबाबत बैठका झाल्या. बैठकांमध्ये पहिला हप्ता म्हणून एफआरपीच्या 70 टक्के रक्कम उर्वरित 30 टक्के रक्कम नफ्यातून देण्यावर एकमत झाले. पण दर किती द्यायचा, यावर सर्वानुमते निर्णय होऊ शकला नाही.