Breaking News

मनोरा आमदार निवासःकार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके पदच्यूत

पदमुक्त  अकार्यकारी पदावर तात्काळ बदली
उपअभियंत्यासह शाखा अभियंता निलंबित  सुपातील भ्रष्ट अभियंत्यांचा थरकाप सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) दि. 08, ऑक्टोबर - दै. लोकमंथनचा गेल्या पाच वर्षातील पाठपुरावा आणि आ.चरण वाघमारे यांची अभ्यासपुर्ण शिष्टाईचा सकारात्मक  परिणामस्वरूप मुंबई शहर इलाखा साबां मंडळातील बेमुवर्तखोर भ्रष्ट अभियंत्यांना सजेवर पाठविण्यात यश मिळाले आहे.मनोरा आमदार निवास प्रकरणात नसलेले  अधिकार वापरून ,असलेल्या अधिकारांची चाकोरी सोडून निधीचा विनियोग केल्याचा ठपका असलेल्या विद्यमान कार्यकारी अभियंता असलेल्या श्रीमती प्रज्ञा वाळके  यांचे सर्व अधिकार गोठवून कार्यकारी पदावरून मुक्त करण्यात आले आहे.सोबत उपअभियंता भुषण फेगडे आणि शाखा अभियंता धोंडगे यांना निलंबित करण्याचे  आदेश शनिवारी राञी आठ वाजेच्या सुमारास निर्गमित करण्यात आले.हे आदेश तात्काळ लागू आहेत.दरम्यान हा प्रकार सन 2012 पासून या क्षणापर्यत सुरू  असल्याचे प्रशासकीय यंञणेच्या निदर्शनास आले असून तत्कालीन कार्यकारी पदाचा पदभार सांभाळणारे किशोर पाटील ,नाशिकचे विद्यमान अधिक्षक अभियंता  रणजीत हांडे यांच्यासह आणखी काही अभियंते कारवाईच्या रडारवर असल्याचे अधिकृत वृत्त आहे.
या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव जी.बी.शिंदे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या आदेशांत म्हटले आहे की,शहर इलाखा साबां मंडळाच्या कार्यक्षेञातील  मनोरा आमदार निवास इमारतीमध्ये कामे न करता बोगस देयके काढण्यात आल्याबाबत आ.चरण वाघमारे,भरतशेठ गोगावले,आ.राजन साळवी यांनी मुख्यमंञी ,साबां  मंञी यांच्याकडे केलेल्या तक्रारीची सर्वंकष पडताळणी केल्यानंतर तथ्य आढळून आल्याने कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांना कार्यकारी पदावरून तात्काळ पदमुक्त  करण्यात येत असून त्यांची अकार्यकारी पदावर तात्काळ बदली करण्याचे आदेश साबां मंञ्यांच्या निदेशावरून निर्गमित करण्यात येत आहे.
या प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांसोबत तत्कालीन सहाय्यक अभियंता श्रेणी 1 चे भुषणकुमार फेगडे व केशव धोंडगे यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असून या  तिघांचे सध्या कार्यरत असलेले विभागच मुख्यालय असल्याचे नमूद आहे.शासनाच्या पुर्वपरवानगीशिवाय या तिघांनाही मुख्यालय न सोडण्याची तंबीही तिघांसाठी  स्वतंञपणे काढलेल्या आदेशात देण्यात आली आहे.
सन्माननीय सदस्यांच्या बरोबरीने दै.लोकमंथनने या न्याय संघर्षात घेतलेल्या भुमिकेचा या कारवाईने विजय झाला असला तरी  हिमनगाचे टोक फक्त सापडले  आहे,सन 2012 पासून सुरू असलेल्या या गैरव्यवहाराची पाळेमुळे खोलवर पसरली असून तत्कालीन कार्यकारी अभियंता व नाशिकचे विद्यमान अधिक्षक अभियंता  रणजीत हांडे,किशोर पाटील यांच्यासह आणखी काही अभियंते या गैरव्यवहाराच्या वाटेवरचे सहप्रवाशी असल्याचे सबळ पुरावे शासन दरबारी दाखल आहेत.त्या  पुराव्यांच्या आधारे उर्वरीत दोषींवरही कारवाई करून संघटीत गुन्हेगारीसाठी मोक्कासह गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्या प्रकरणी 120(34)ब अन्वये गुन्हा दाखल  व्हावा या मागणीव लोकमंथन ठाम आहे.
गेल्या काही दिवसांपासून संशयाच्या भोवर्यात असलेल्या कार्यकारी अभियंता वाळके यांनी आपल्या बचावार्थ पुन्हा खोट्याचा आधार घेऊन निर्दोषत्व सिध्द करण्याचा  आटापिटा प्रशासनाला कारवाईपासून रोखू शकला नाही.सबळ पुरावे विरोधात असतांनाही थातूरमातूर स्पष्टीकरण प्रशासनाने फेटाळून लावले.आणि कारवाईची  अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश मुख्यअभियंत्यांना अवर सचिवांनी दिले.