Breaking News

ज्येष्ठांचा अनुभव समाजासाठी हितकर - सुवर्णा जाधव

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा मोठा आधार असतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा हा समाजासाठी झाला पाहिजे. यासाठी त्यांना समजावून घेऊन  निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात त्यांना सहभागी करुन घेतल्यास चांगले कामे होवू शकतात. स्टेशन परिसारातील ज्येष्ठ नागरिक संघाचे काम चांगले आहे. त्यांच्या विविध समस्या  सोडविण्यासाठी आपण नेहमीच पुढाकार घेऊन त्यांच्या समस्या मार्गी लावतो. संघाच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यात नागरिकांचाही सहभाग  असतो. संघाच्यावतीने तयार करण्यात आलेला दिवाळी अंक हा वाचनिय असून, आरोग्य, नोकरीतील अनुभव, धार्मिक, वैज्ञानिक, थोरांचे विचार, आर्थिक आदि विविध विषयांचे  लिखाण असल्याने सर्वसमावेशक असा हा अंक वाचनिय असाच आहे, असे प्रतिपादन मनपाच्या स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव यांनी केले.  स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नाग रिक संघाच्या ‘दिवाळी अंका’चे प्रकाशन मनपा स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्ष के.डी.खानदेशे, उपाध्यक्ष रामचंद्र सिन्नरकर, सचिव  शिवाजी ससे, नुरआलम शेख,ज्ञानेश्‍वर कविटकर,अशोक झरकर,दिगंबर नगरकर,नाना दळवी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना संघाचे अध्यक्ष के.डी.खानदेशे म्हणाले, संघातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. विविध विषयांवरील तज्ञांची व्याख्याने, सहली, भजन, किर्तन, संगीतसभा, हुरडा  पार्टी, आदींचे आयोजन वृद्धाश्रम, सामाजिक संस्थांन मध्ये केले जाते.ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष असून, या अंकात विविध विषयांना स्पर्श करणारे साहित्य  समाविष्ठ असल्याने अंक सर्वांच्या पसंतीस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली.