Breaking News

महापुरुषांचे विचार घराघरापर्यंत पोहचवा : प्राध्यापक आनंद भोजने

बुलडाणा, दि. 23, ऑक्टोबर - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा  ज्योतिबा फुले या महापुरुषांचे विचार घराघरात पोहचवा, असे मौलिक प्रतिपादन प्राध्यापक आनंद भोजने यांनी  वरवंट बकाल येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित नागरी सत्कार  प्रसंगी बोलताना व्यक्त केले. 
दि.21 ऑक्टोबर रोजी वरवंट बकाल ग्रामपंचायतीच्या वतीने वानखेड भूषण प्राध्यापक आनंद भोजने तसेच वरवंट बकाल येथील युवा युद्योजक प्रल्हादराव हागे यांचा नागरी सत्कार  करण्यात आला. येथील आठवडी बाजारातील भव्य पटांगणावर आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी नव निर्वाचित सरपंच श्रीकृष्ण दातार हे होते. यावेळी ग्रामपंचायतच्या  वतीने प्रा.भोजने यांचा सपत्नीक सत्कार सरपंच, उपसरपंच यांच्या वतीने तर उद्योगपती प्रल्हादराव हागे यांचा माजी सरपंच यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेट वस्तु देवून करण्यात  आला. या सत्कार समारंभाला ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती समिती प्रमुख, महिला मंडळाच्या अध्यक्षा माजी सरपंच वामनराव ढगे, शामराव डाबरे,  नारायणराव ढगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
शिक्षणामुळे माणसाचा सर्वांगीण विकास शक्य असून त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला शिकवून उच्च शिक्षित करावे. त्यामुळे गावाचा आणि परिसराचा नावलौकीक  वाढण्यास महत्वाची मदत होते. असे विचार भोजने यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील वानखेड आणि वरवंट बकाल या गावात भोजने यांच्या वतीने राजा शिवछत्रपती, सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व मी शिवाजी राजे भोसले  बोलतोय या चित्रपटाचे सतत पाच दिवस प्रदर्शन करण्यात आले. त्याचा लाभ हजारो प्रेक्षकांनी घेतला. यासाठी स्वखर्चाने व्हिडीओ प्रोजेक्टर वापरण्यात आले होते. दरवर्षी दिवाळी  निमित्य गावाला आल्यावर भोजने हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवितात या वर्षीच्या त्यांच्या उपक्रमाचे अनेक ांनी कौतूक केले.
प्रा.भोजने हे संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या गावचे मुळ रहिवासी असून ते व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे स्थायिक झाले आहेत. दरवर्षी दिवाळीनिमित्त एक आठवडा ते  आपल्या मित्रांसोबत घालविण्यासाठी सहकुटुंब गावाला येतात.
या दरम्यान गेल्या वर्षात त्यांचा वानखेड ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य नागरी नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर प्रल्हाद हागे हे वरवंट बकाल येथील मूळ रहिवासी  असून व्यवसायानिमित्ताने पुणे येथे स्थायिक झाले आहेत. दिवाळी निमित्ताते सुद्धा सहकुटुंब गावाला येत असतात. या कालावधीत गावच्या विधायक समस्या जाणून घेवून तन मन  धनाने मदत करीत असतात. ग्रामपंचायतीच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन प्रल्हाद दातार यांनी केले तर आभार सरपंच  श्रीकृष्ण दातार यांनी मानले.