Breaking News

डॉ आंबेडकरांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी 125 व्या जयंतीनिमित्ताने कर्जत येथे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धाचे संकलन करून  त्याचे पुस्तक येथील परिवर्तन वाचनालय याचे वतीने नुकतेच प्रकाशित करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे जीवन कार्यावर राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन क रण्यात आले होते त्या निबंध स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या 54 व्या वार्षिक अधिवेशनामध्ये लातूर येथे करण्यात आले.  या अधिवेशनाचे स्वागतअध्यक्ष डॉ अशोक कोकडे याचे हस्ते व सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ग्रंथमीत्र त्रिंबकराव झवर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल  बोरगमवार, मा. आमदार गंगाधर पटणे, नंदूभाऊ बनसोड, मनोज गोगटे, राजेंद्र वैती, शिवकुमार शर्मा, यांच्या उपस्थितीत प्रकाशनसोहळा संपन्न झाला. यावेळी स्वागतअध्यक्ष डॉ  अशोक कोकडे व मान्यवरांनी परिवर्तन ग्रामीण वाचनालयाचे कौतुक करून या पुस्तकाचे संपादकीय मंडळ पनाजी कदम, प्रा. विक्रम कांबळे, चंद्रकांत सरोदे, बाजीराव अनभुले,  बिभीषण अनारसे, अतुल आखाडे, नवनाथ शिंदे, दादासाहेब बिटके, समाधान पाटील, याचे अभिनंदन केले. या पुस्तकाला यशदाचे बबनराव जोगदंड याची प्रस्तावना लाभली आहे.
या पुस्तकामध्ये दहा निबंधाचा समावेश असून बहुतांशी निबंध विद्यार्थी विद्यार्थिनी याचे कडून आलेले असून ग्रामीण भागातील लेखक घडू पाहणार्‍या या कलाकारांना या पुस्तकरूपाने  खरी प्रसिद्धी मिळाली आहे.