देशाबाहेर पोष्टाने पार्सल पाठवणे आता शक्य
औरंगाबाद, दि. 11, ऑक्टोबर - काळाच्या बरोबर राहण्यासाठी पोष्ट खात्याने महत्वाचे पाउल उचलले असून आता पोष्टातून थेट परदेशात पार्सल पाठता येणार असून त्याचे नाव द इंटरनॅशनल ट्रॅक्ड पॅकेट सर्वीस असे देण्यात आले आहे याचा फायदा बियाणे कंपन्याना आणि लघुउदयोजकांना होणार आहे. ते आपल्या उत्पादनाचे सँपल कमी किंमतीत परदेशात पाठवू शकतील. या साठी पहिल्या टप्प्यात आ ॅस्ट्रेलिया , कंबोडिया,इंडोनेशिया, जपान ,मलेशिया,सिंगापूर ,साउथ कोरिया,व्हिएतनामा या देशांची निवड केली आहे. या पार्सलसाठी जीएसटी लागणार नाही अशी माहिती पोष्टविभागाचे मराठवाडा विभाग प्रमुख प्रवीण कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोष्ट खात्या तर्फे या आठवडयात राष्ट्रीय डाक सप्ताह आयोजित करण्यात आला असून त्यात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत.