Breaking News

अभिनेता राम कपूर विरोधात गुन्हा दाखल

मुंबई, दि. 17, ऑक्टोबर - फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेता राम कपूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘मावी बिझनेस व्हेंचर्स एलएलपी’ या कंपनीकडून घेतलेले कर्ज  सल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी मागील महिन्यात राम विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
ऑगस्ट 2016 मध्ये कुलाब्यातील ‘मावी बिझनेस व्हेंचर्स एलएलपी’ या कंपनीकडून रामने कर्ज घेतले होते. मात्र वर्षभरानंतरही रामने 35 लाख रुपयांची रक्कम फेडली नसल्यामुळे  त्याच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्डाची थकबाकी भरण्यासाठी रामने पैसे उसने घेतले होते असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.