Breaking News

जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

दहा ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची लढत

अहमदनगर, दि. 06, ऑक्टोबर - श्रीगोंदा तालुक्यातील दहा ग्रामपंचायत निवडणुची रानधुमाळी जोरात सुरु आहे . मागील काही वर्षा पर्यंत निवडणुकीचा प्रचार म्हंटले की भिंती वर जाहिरात करणे ,उमेदवारांची माहिती पत्रक वाटप करणे अश्या पद्धतीने प्रचार होत होता . आता मात्र या सोशल मिडियाच्या जमाण्यात थेट निवडणुकीचे मतदान होण्या पूर्वीच सोशल मिडियात गावच्या सरपंच आणि इच्छुक उमेदवारांची नावे असलेले लिंक देऊन कोण होणार गावचा सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य याचे पोल (सर्वे ) सुरु आहेत .
श्रीगोंदा तालुक्यातील दहा पैकी ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे पँनल तयार झाले . आणि प्रचार सुद्धा सुरु झाला आहे. तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाचे असणारे गावाची निवडणूक असल्याने नेत्यासाठी या निवडणूक प्रतिष्ठा असणार्‍या आहेत .काष्टी त माजी मंत्री बबनराव पाचपुते त्यांचे बंधू जिल्हा पारिषद् सदस्य सदाशिव पाचपुते यांच्या पँनल विरोधात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी समर्थका चा पँनल आहे . बेलवंडी मधे माजी जिल्हा पारिषद् उपाध्यक्ष आंणासाहेब शेलार यांच्या पँनल विरोधात पाचपुते समर्थकाचा पँनल आहे. पारगाव सुद्रिक मधे पाचपुते समर्थक आणि नागवडे , जगताप समर्थक यांचा पँनल आहे . तर घोगरगाव मधे माजी जिल्हा पारिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस समर्थक पँनल विरोधात आ. जगताप समर्थकांचा पँनल .तर बनपिप्री मधे ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाल्याने फक्त सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे . तिथे जिल्हा पारिषद् सदस्य पती सचिन जगताप यांचा पँनल आहे .अशीच पारिस्थिति  माठ , तांदली दुमाला , चवर सांगवी , तरड़ गव्हाण या गावात ही आहे . माजी मंत्री पाचपुते यांचे समर्थक विरुद्ध आमदार जगताप , नागवडे समर्थकाचे पँनल उभे आहेत .
या दहा गावात सध्या तरी स्थानिक कार्यकर्ते प्रचाराची धूरा संभाळत आहेत . प्रचार सभा अजुन सुरु झाल्या नसल्या तरी मतदाराच्या गाठीभेटी होम टू होम सुरु आहेत . या बरोबर आता किमान प्रत्येक घरात एक जण का होइना फेसबुक आणि व्हाट्सअप वापरणारा एक जण का होईना असल्याने यावर ही आपल्या गावचा सरपंच कोण होणार याचा सर्वे आणि पोल सुरु आहेत . यात कोण होणार सरपंच अशी लिंक टाकुन त्यात सरपंच कोण होणार याची नावे टाकले आहेत . अश्या अनोख्या पद्धतीने प्रचार आणि निवडणूक पूर्व सर्वे सुरु आहेत.
बारा ग्रामपंचायतीसाठी
शनिवारी मतदान
 शेवगांव ः  शेवगाव तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या शनिवारी  सात ऑक्टोबरला मतदान होणार आहे.या निवडणुकीत प्रथमच संपूर्ण गावातील मतदार  सरपंच निवडून देणार आहेत. हे या निवडणुकीचे वैशिष्टय आहे. अलीकडे केंद्र व राज्य शासनाचा मोठा विकास निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असल्याने,  सरपंचांनाही जास्त अधिकार मिळाल्याने गावावर आपलीच कशी पकड राहील,  या यासाठी विविध पक्षाचे कार्यकर्ते या निवडणुकीसाठी सरसावले आहेत.  या सर्व ठिकाणी चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतीचे संकेत मिळत आहेत मतदानासाठी अवघे दोन दिवस उरल्याने सरपंचदी व सदस्यपदी  निवडून येण्यासाठी साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब सुरू झाला आहे.
माजी आमदार नरेंद्र घुले आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचे  गाव असलेल्या दहिगावने येथे बिनविरोध निवडणुकीची परंपरा मागील वेळी खंडीत झाली. या निवडणुकीत पंधरापैकी चौदा सदस्य बिनविरोध झाले. परंतु सरपंच पदासाठी तिरंगी लढत होत असून राष्ट्रवादीकडून सुभाष पवार तर भाजपकडून लक्ष्मण काशीद व अपक्ष बशीर पठाण रिंगणात उतरले आहेत. स्मार्ट व्हिलेज अमरापूर येथे सरपंच पदासाठी तब्बल सात उमेदवार रिंगणात उभे आहेत. विद्यमान सरपंच विजय पोटफोडे यांच्या पत्नी संगीता पोटफोडे,  माजी उपसरपंच राम पोटफोडे यांच्या पत्नी सपना पोटफोडे ,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांच्या पत्नी वंदना चौधरी , सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष नामदेव गरड यांच्या पत्नी वंदना गरड यांच्यासह आशा गरड, यास्मीन सय्यद, रुपाली पोटफोडे या उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतविभागणी होऊन धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.
आखेगाव येथे सरपंच पदासाठी सात जण निवडणूक रिंगणात आहेत. येथे राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य कृष्णा पायघन यांच्या गटातर्फे संजय पायघन,  केंदारेश्‍वरचे माजी उपाध्यक्ष  माधव काटे व त्यांच्या पत्नी आणि पंचायत समितीच्या माजी सभापती मंगल काटे यांच्या गटाकडून शंकर काटे , जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांच्या जनशक्ती आघाडीकडून भगवान  काटे,  अपक्ष बाबासाहेब गोर्डे उमेदवार आहेत. जोहरापूर येथे तिरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादीचे दिलीप लांडे यांच्या गटाकडून सरपंच पदासाठी  जालिंदर वाकडे,  भाजपचे गंगा खेडकर यांच्या गटातर्फे नितीन जाधव तर अपक्ष ताराचंद घुटे हे उमेदवार आहेत. वाघोली येथे दुरंगी लढत होत असून राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. गोरक्ष जमदाडे व भाजपकडून बाबासाहेब गाडगे हे उमेदवार आहेत.   भायगाव मध्ये हरिभाऊ दुकळे व एकनाथ लांडे हे सरपंचपदाचे उमेदवार आहेत.  रांजणीत मनीषा  घुले,  वैशाली घुले सुवर्णा धोटे,  द्वारका न-हे   यांच्यात लढत होत आहे. दहिगावने, भायगाव आणि रांजणी ही तीनही  गावे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला येतात. तेथे घुले बंधुंची भूमिका कोणासाठी अनुकूल हे मतदानानंतरच स्पष्ट होईल. बागायती खानापूरमध्ये सरपंच पद राखीव रस्त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.  येथे राजेंद्र जगधने, अण्णा जगधने,  लक्ष्मण जगधने,  किशोर ससाणे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  कुरुडगाव येथे राष्ट्रवादीचे सरपंच पदाचे उमेदवार अशोक औटी,  जालिंदर काळे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत फलकेवाडी मध्ये विद्यमान सरपंच रोहिणी फाळके यांच्यासह बाळासाहेब मरकड,  शिरीष काळे,  संभाजी शिंदे, प्रसाद फलके हे तर प्रभू वडगावमध्ये गंगुबाई बटुळे,  गुलबस बटुळे,  अंजू बटुळे तर खामगावमध्ये दिगंबर बडगे वसिममिय्या काझी,  मुजमम्मील पटेल हे नशीब आजमावत आहेत. पक्षीय पातळीवर ही निवडणूक होत नसली तरी गावपातळीवर कार्यकर्त्यांचा कस या निवडणुकीत लागतो .आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची गावात काय किंमत आहे याची चाचपणी यानिमित्ताने होत असते. त्यामुळे विविध पक्षाचे कार्यकर्ते ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी सरसावले आहेत.दिवाळी सणाच्या तोंडावर ही निवडणूक होत असल्यामुळे मतदारांचीही दिवाळी गोड होऊ लागली आहे .गावपातळीवरील ग्रामपंचायतीला केंद्रावर राज्य शासनाकडून मोठया प्रमाणामध्ये थेट निधी मिळत आहे तसेच सरपंचाला जादा अधिकार देण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले असल्याने सरपंच होण्यासाठी अटीतटीच्या लढती होण्याची होण्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने जात धर्म मित्र नातेवाईक यासारख्या ने गाठली मतदारांना करून दिल्या जात आहेत निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचाही वापर उमेदवारांकडून होत आहे.  निवडणूक एक दोन दिवसावर येऊन ठेवल्याने आता मतदारांना लुभावण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखविली जात आहेत. त्यातच ओल्या पार्ट्यांनाही उत आला आहे. एकंदरीतच बाराही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाचे निवडीसाठी मोठी चुरस  दिसून येत आहे.
109 सदस्यपदासाठी
निवडणूक
पाथर्डी ः तालुक्यात अकरा ग्रामपंचायतीच्या 109 सदस्य पदासाठी व सरपंच पदाच्या 11 जागेसाठी शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी निवडणुक होणार असुन लक्ष्मीपुजना अगोदर सबंधीत गावामध्ये सर्वत्र होणारे लक्ष्मीदर्शन निवडणुकीतील चुरस वाढवणारे ठरले आहे. सर्वच पक्षीय प्रमुख नेत्यांनी मात्र या निवडणुकीपासुन स्वतःला दुर ठेवले आहे. नेत्याशिवाय होणारी निवडणुक बदललेल्या पध्दतीमुळे गावोगावी नेते निर्माण करणारी ठरत आहे. हायटेक ,डिजीटल व सोशल मिडियावरिल प्रचारामुळे सर्वच उमेदवार धास्तावले आहेत.
पाथर्डी तालुक्याचे राजकीय विभाजन होउन पाउण तालुका शेवगाव विधानसभा मतदार संघात तर उर्वरीत तालुका राहुरी मतदार संघात विभागला गेला आमदार मोनिका राजळे व आमदार शिवाजी कर्डीले यांचा संपर्क ग्रामपंचायत निवडणुक माध्यमातुन जाहीरपणे नाही . माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शेवगाव तालुक्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. राहुरी मतदारसंघातील आ.कर्डीले विरोधकांना तालुक्यातील गावाची पुरती ओळख नाही .कडीले यांना ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तालुक्यात डोकावायचे आहे.आचारसंहितेचे कारण सांगत नेते दुर असले तरी आचारसंहिता निवडणुकीत फारशी जाणवत एवढे मोकळे ढाकळे वातावरण आहे.तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी97 उमेदवार तर 109 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी250 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. मात्र तालुक्याचे लक्ष तिसगाव,भालगाव कोल्हार व कोरडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर एकवटले आहे.तिसगाव मध्ये तर विधानसभेच्या थाटात निवडणुक रंगली असुन राजकीय दहशत वाढल्याने सर्वसामान्य मतदार काहीही बोलत नाहीत. सरपंचांचे अधिकार वाढवुन थेट जनतेतुन निवडणुक घेण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर तालुक्यात पहिलीच निवडणुक असुन सरपंच पदाबाबतच्या निर्णयाने खुद्द उमेदवार खर्चाने हबकुन गेले आहेत. सबंधीत गावचा आमदार अशी ओळख नव्या सरपंचाची करून दिली जात असल्याने गावचे कारभारी गावचे आमदारपद आपल्या हातात असावे अशा पारंपारिक विचारातुन रिंगणात उतरले आहेत. भालगाव मध्ये  भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जेष्ठ नेते पांडुरंग खेडकर, अंकुश कासुळे कोल्हारमध्ये माजी जि.प. सदस्य मोहन पालवे व माजी पंचायत समिती सभापती संभाजी पालवे यांचा पारंपारिक संघर्ष या निवडणुकीतही शिगेला पोहचला आहे.तिसगाव मध्ये जेष्ठ नेते काशिनाथ लवांडे विरूद्ध त्यांचेच राजकीय शिष्य भाऊसाहेब लोखंडे यांची लढत रंगतदार ठरणार आहे.