Breaking News

बेलापुरात फटाक्यांच्या दुकानांना आग; दोन लाखांचे नुकसान

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - दिवाळीत फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे तीन ठिकाणी आगीत लागण्याच्या घटना घडल्या असून यात एका व्यापार्याचे दोन ते अडीच लाख रुपयांचे  नुकसान झाले. तर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अन्य व्यापार्‍यांचे मोठे नुकसान टळले. दरम्यान, याआगीत एका शेतकर्याचा दहा गुंठे ऊस जळून खाक झाला.  अग्निशमनदलाच्या प्रयत्नामुळे आग नियंत्रणात आणणे शक्य झाले.