Breaking News

संग्राम पतसंस्थेतर्फे सभासदांना 15 टक्के लाभांश व दीपावली भेट वस्तू वाटप

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - संगमनेर तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणार्या व माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब व माननीय आमदार  डॉ.सुधीर तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालविल्या जाणार्या संग्राम पतसंस्थेने कायम सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले असून यावर्षी संस्थेच्या सर्व  सभासदांना 15 टक्के लाभांश सेव्हांग्ज खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहिती मॅनेंजर उमेश शिंदे यांनी दिली आहे.
सन 2016-2017 या आर्थिक वर्षामध्ये संस्थेस 1 कोटी 51 लक्ष नफा झालेला असुन 50 कोटी रक्कमेच्या ठेवी जमा झाल्या आहेत.व सस्थेने या  कालावधीमध्ये 40 कोटी रकमेचे कर्ज वाटप केलेले असुन सस्थेने ठेवीवर आकर्षक व जास्त व्याजदर देण्याचे धोरण या ही वर्षी नेहमीप्रमाणे ठेवलेले  असल्याने संस्थेकडे ठेवीदारांचा ओघ वाढत आहे. संस्थेस याही वर्षी ऑडिट वर्ग ’अ’ मिळालेला आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन  डॉ.एन.एस.शेख .व्हा .चेअरमन राणीप्रसाद मुंदडा , मा.संचालक श्री.सुर्यकांत  शिंदे सर .श्री.विजय गिरी ,मॅनेजर श्री.उमेश शिंदे , सभासद व हितचिंतक  तसेच  संस्थेचे कर्मचारी हजर होते    
यावेळी दिपावली निमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीरजी तांबे साहेब यांच्या हस्ते दिपावली भेट वस्तुंचे  वाटप संस्थेच्या सभासदांना करण्यात आले.