विरारच्या मंदिरावर वीज कोसळली; मूर्तींचे नुकसान, जीवितहानी नाही
विरार, दि. 09, ऑक्टोबर - विरारच्या श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या मानक स्तंभावर वीज कोसळून त्यावरील मूर्तींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या मंदिराच्या परिसरात असलेल्या 61 फुटी मानक स्तंभावर ही वीज कोसळली आणि चार बाजूंना असलेल्या मूर्तींही तुटल्या. वीज कोसळली, त्यावेळी मंदिरातील सर्व लोकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी भोजनशाळेत आश्रय घेतला होता. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
विरार पूर्व महामार्गावरील शिरसाड गावात ही घटना घडली. या मंदिरात गेल्या वर्षी हा मानक स्तंभ उभारण्यात आला होता. वीज कोसळल्याने स्तंभाचा 50 टक्के जमीनदोस्त झाला. विशेष म्हणजे स्तंभाच्या चारही बाजूने श्री आदिनाथ, श्री अजितनाथ, श्री संभवनाथ आणि श्री अभिनंदन नाथ या देवतांच्या 10 फुटी संगमरवरी मूर्तीही बसवण्यात आल्या होत्या. मात्र, या स्तंभ कोसळल्याने या मुर्ती तुटल्या तसेच, स्तंभाच्या संरक्षकभिंतींनाही तडे गेले.