Breaking News

दिलीप वळसे पाटील हे सद्गुणी राजकारणी - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 28, ऑक्टोबर - विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे उत्तम प्रशासक व सद्गुणी राजकारणी असलेले नेते आहेत, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आज येथे काढले. वळसे पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले की, एखाद्या राजकीय नेत्याच्या नवीन पर्वाची सुरुवात वयाच्या एकसष्टीनंतर सुरू होते. अशी नवी इनिंग श्री. पाटील यांची सुरू झाली आहे. विधीमंडळात  त्यांच्यासोबत 17 वर्षे काम करण्याची संधी मिळाली. संसदीय कार्यपद्धतीचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम करणारा हा नेता आहे, असे श्री. फडणवीस  म्हणाले. ऊर्जामंत्री असताना त्यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. विजेची बिकट स्थिती असताना त्यांनी केलेल्या कामांची दखल सर्वांनीच घेतलेली आहे. त्यांनी ॠमहाराष्ट्र ना ॅलेज कार्पोरेशन’ स्थापन केले तर खाजगी विद्यापीठाची मूळ कल्पना त्यांनी मांडली. विधानसभेचे अध्यक्ष असताना विधानमंडळाला दिशा दिली. शिक्षण, ऊर्जा, सहकार, दुग्धविकास  या क्षेत्रात त्यांनी केलेले काम उत्तम दर्जाचे आहे. त्यांनी आपल्याला मिळालेल्या पदाचा वापर गोरगरिबांच्या कल्याणासाठी केला, असेही श्री. फडणवीस म्हणाले.
दिलीप पाटील हे अत्यंत हुशार राजकारणी आहेत. त्यांच्या जीवनात त्यांना अनेक पदे मिळाली, त्यांनी कधी उन्माद केला नाही. विधीमंडळ कामकाजाचा त्यांचा गाढा अनुभव आहे.  शिक्षण, सहकार क्षेत्रात त्यांनी उत्तम कामगिरी केली. सहकार क्षेत्रातील अनेक प्रश्‍न सोडवण्याची त्यांची एक हातोटी आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी  म्हणाले. अलीकडच्या काळात एका नेत्यासोबत शेवटपर्यंत काम करणे कठीण आहे. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहून एकनिष्ठतेने काम केले. सध्या राज्यात सत्ताधारी विरोधक ांसारखे वागतात. विरोधक सत्ताधारी झाल्यामुळे त्यांना सत्ता बोचत असल्याचेही श्री. गडकरी यांनी सांगितले.