Breaking News

दिवाळीसाठी मामाच्या गावी आलेल्या मुलाचा साप चावल्याने मृत्यू

औरंगाबाद, दि. 23, ऑक्टोबर - दिवाळीच्या सुट्टीत आजोळी आलेल्या मुलाचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथे शनिवारी पहाटे घडली.  सौरभ हरिदास गोरे (वय 13,रा. हिसोड, ता. भोकरदन) हा दिवाळीच्या सुट्टीत मामा योगेश दौड यांच्या घरी आला असता मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास विषारी सापाने हाताला  चावा घेतल्याने त्यास सिल्लोड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आला. प्रथमोपचार केल्यानंतर सौरभ घाटी रूग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टराला त्यास तपासून मयत  घोषित केले. या प्रकारणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.